अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, आपणास कळविण्यास आत्यानंद होतो की, अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्र चार्य जी महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम (महाराष्ट्र) यांचे उत्तर अधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचा 9 मार्च 2024 रोजी उपासक दीक्षा व 10 मार्च 2024 साधक दीक्षा कार्यक्रम सकाळी 9 वाजता स्थळ: जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान उपपीठ उत्तर महाराष्ट्र, श्रीक्षेत्र रामशेज, ता. दिंडोरी जि. नासिक येथे आयोजित केला आहे.
संस्थानाच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत, यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय उपक्रम, आर्थिक दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला समीक्षकरण, आपत्कालीन मदत उपक्रम कायदेविषयक साक्षरता शिबिरे आयोजित केली जातात. तरी या महामंगल समयी आपण सहकुटुंब सहपरिवार आप्तेष्ट मित्रांसह कार्यक्रमास उपस्थित राहून परमपूज्य जगद्गुरु श्री च्या प्रवचनाचा दर्शनाचा व लाभ घ्यावा. ही नम्र विनंती. ओम नरेंद्र नाथाय नमः🙏🏼