ग्रामसेवकांचा मोठेपणा 1 मे व कामगार दिनी ग्रा पं कर्मचारीस दिला ध्वजारोहणाचा मान
प्रतिनिधी - भाऊसाहेब नागरे लासलगाव

रेडगाव बुद्रुक ता.निफाड जि. नाशिक येथे 1 मे , महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण नुकतेच ग्रामपंचायत कर्मचारी *अण्णा केदारे* यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता असल्याने राजकीय व्यक्तींना ध्वजारोहण करण्यासाठी शासनाची परवानगी नाही त्यामुळे कार्यालयाचा ध्वजारोहण प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांनी ठरवायचं असतो परंतु ग्रामसेवक श्री सुभाष जाधव यांनी आपल्या मनाचा मोठेपणा करून कामगार दिनाच्या औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण ग्रामपंचायतचे कर्मचारी अण्णा केदारे यांच्या हस्ते करून करण्यात आले.
आपल्या मनाचा मोठेपणा दाखवणारे ग्रामसेवक श्री. सुभाष जाधव यांनी ग्रामपंचायत कर्मचारी आण्णा केदारे यांना जो ध्वजारोहण करण्याचा मानसन्मान दिला त्याबद्दल त्यांची कर्मचारी बद्दल प्रेम भावना आणि सन्मानाची कृतज्ञता या ठिकाणी दिसून येते ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करताना प्रथमतः ध्वजाचे पूजन करून नंतर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी श्री सुभाष जाधव,ग्रामसेवक यांच्या कार्याची सर्व स्तरात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी निफाड गटविकास अधिकारी श्री.महेश पाटील,विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे,राजेश बोरसे,राजेश थोरात,ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सदस्य मुख्याध्यापक आरोग्य सेवक अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी युनियन निफाड तालुका वतीने श्री.सुभाष जाधव,ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले.