के. के. वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेबनगर येथे थोर गुरु शिष्यांना अभिवादन
प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर भवर

के. के. वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेब नगर येथे पद्मश्री, कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी तात्यासाहेब बोरस्ते व दानशूर काकूशेठ उदेशी यांची संयुक्त पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोलतांना कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे नातू, स्माईल व स्पिनॅच संस्थेचे सचिव, माननीय श्री अजिंक्य बाळासाहेब वाघ यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या कार्याला उजाळा देत राजकारणाला व समाजकारणाला शेतकरी, कष्टकरी, पिचलेल्या सर्वहारा वर्गाच्या बाजूने नेत, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आयुष्य खर्च करणारे व अवघा तालुका, जिल्हा, व महाराष्ट्रच नव्हे तर भारताला ज्ञात झालेले काका हे खऱ्या अर्थाने कर्मवीर असल्याचे नमूद केले. तसेच मा. श्री. रमाकांत जाधव सर यांनी आपल्या मनोगतातून पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जीवनकार्याचा आढावा विविध प्रसंगांच्या माध्यमातून व्यक्त केला. मुंबई महाराष्ट्रात असावी यासाठीच्या चळवळीतील काकासाहेबांचा सहभाग कसा मोलाचा होता हेही विषद केले. परिसाच्या सहवासात आयुष्याचं सोनं व्हावं, याप्रमाणे समाजातील शेवटच्या माणसाच्या विकासाचा विचार करणारे, युक्ती आणि कृतीत अंतर न ठेवणारे, आकाशाच्या उंचीचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर काकासाहेब वाघ असल्याचे मा श्री जयवंतराव वाघ यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
आदिती वाघ, तनुजा कोल्हे, अनोखी गांगुर्डे, मयुरी गायकवाड, तन्वी रकिबे, या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून काकासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, श्री शरद कदम यांनी आपल्या मनोगतातून नेतृत्व कसे व किती खंबीर असावे हे स्पष्ट करतांना काकासाहेबांच्या आयुष्यातील विविध प्रसंग मांडत काकांच्या कार्याला अभिवादन करून त्यांचे सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील अमूल्य असे योगदान कधीही न विसरता येणारे असल्याचेही विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना सोनार यांनी केले तर यशवंत पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी विकास शिंदे, गणेश आवारे, शेख शादाब, संदीप शिंदे, किरण शिंदे, योगेश पुंड, उत्तम कर्वे, सचिन कोल्हे, चकोर स्वप्नील, योगेश खैरे, भूषण निकम, राजेश लोखंडे, सय्यद सर, भाग्यश्री पानगव्हाणे, आढाव सोनाली, मोकळ अर्चना, भाग्यश्री खरक, बेंडके पल्लवी, रोशनी शिंदे, पल्लवी कोल्हे, शितल शिंदे, श्वेता पगारे, दिपाली दाभाडे, पूनम अष्टेकर, सारिका कुशारे, योगिता जगझाप, सुरेखा सोनवणे, नेहा देसाई, रीना शिरसाठ, योगिता बिडवे, सारिका गायकवाड आदी उपस्थित होते.