मोकळ्या जागेत जैविक कचरा टाकल्यामुळे संबंधितांचा शोध घेऊन 10 हजाराचा दंड वसूल
नाशिक प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका जैविक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक राकेश साबळे व प्रमोद बागुल हे दोघे गुरुवारी दि.29 सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास राजमाता मंगल कार्यालय ,तलाठी कॉलनी लिंक रोडने तारवाला नगर येथे जात असता त्यांना रस्त्यालगत अज्ञानाकडून जैविक कचरा टाकल्याचे निदर्शनात आले. कचऱ्याची तपासणी केली असता मुदत बाह्य इंजेक्शन, नीडल व इतर वापर केलेले जैविक साहित्य आस्थाव्यस्था पडलेले आढळून आले. त्या वेगवेगळ्या कंपन्यांचे बायोमेडिकल वेस्ट सुद्धा आढळून आले. जैविक कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे कठीण होते ,परंतु त्यांनी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांना लगेच माहिती दिली. व दराडे यांनी अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले असता दरम्यान कचऱ्यात पुरावा शोधत असताना त्यांना पश्चिम विभागातील एका फार्मसी ची पावती आढळून आली, त्या पावतीवरील संपर्क क्रमांक त्यांनी घेऊन त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता मालकास जागेवर बोलाविले, त्यांना उघड्यावर टाकलेल्या जैविक कचरा दाखवून दिला.
आमच्यागोदामात उंदीर घुसल्याने तो कचरा बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मुदत बाह्य टाकलेला कचरा हा मुदत बाह्य जैविक कचरा आमच्याकडे कामाला असलेल्या एका व्यक्तीने टाकल्याचे त्यांनी कबूल केले .त्यानुसार पंचवटी विभागातील कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने त्या मालकाला दहा हजार रुपयांचा दंड वसूल करत या बायोमेटिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्याचबरोबर विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकामार्फत शुक्रवारी दि.30 पंचवटी विभाग यांनी विविध आस्थापनाच्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळल्याने पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली. दरम्यान दोन अस्तापनांना प्रथमतः पुन्हा 5000 प्रमाणे एकूण दहा हजार रुपये असा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई स्वच्छता निरीक्षक प्रमोद बागुल, राजेश साबळे ,सागर रेवर ,प्रशांत तेजाळे यांच्या पथकाने केली .