
भाकुर्डे श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे ‘बैलपोळा.’
भाकुर्डे खडकी,कोसवण,जयदर,सुळे मोहबारी,पिपळा,काठरा ,लखाणी, कातळगाव,साकोरे,भैताणे,
या गावात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्व आहे.
शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या सकाळी शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला गेरू लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्हेने सजविण्यात येते.
शेतकर्याच्या घरी बैलांचे स्वागत मोठ्या उत्साहात