
वेळापुर –
सुरक्षित चला व अपघात टाळा असे लिहून वाचून नाही तर.ते अमलात आणावे लागते, नाही तर अपघात घडणारच.याचे उदाहरण म्हणजे वेळापूर येथे गवळी बाबा मंदीरा जवळ नेहमी घडणारे अपघात , आजही गवळी बाबा मंदिरा जवळ अज्ञात फोर व्हीलर गाडी व बुलेट गाडी क्र.mh 15 hd 4721 यांची समोरासमोर धडक होऊन बुलेट वरील सागर पानमळे यांचा जागीच मृत्यु झाला व त्यांच्या सोबत असणारे(नाव समजले नाही )ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे रुग्णवाहिकेत तत्काळ हलविण्यात आले. सागर पानमळे हे सैन्य दलात असून ते तीन दिवसांपूर्वीच सैन्यदलातून रजेवर आलेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा लासुरकर हे करत आहे.