
नासिक – बाजार समितीतील कांदा खरेदी आणि सरकारकडून केंद्रात केली जाणारी खरेदी यातील फरक, तसेच सरकारी खरेदीतील त्रुटी मधील सुधारणा करण्यासाठीचे उपाय अशा अनेक मुद्द्यावर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या समितीने लासलगाव येथे शेतकरी बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी, अशा विविध घटकांशी भेटून चर्चा केली .नाफेड व एनसीसीएफ च्या खरेदीवर उत्पादकाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, या खरेदीची समितीने चौकशी केली. लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदीच्या विषयामुळे व सरकारी कांदा खरेदी विषयी उत्पादक समाधानी नव्हते. सरकारी वर्गातील रोशामुळे शेतकरी वर्गातील रोशामुळे महायुतीला राज्यात अनेक जागा गमावा लागल्या. आणि सत्ताधाऱ्यांनी ते मान्य सुद्धा केले .सरकारी कांदा खरेदी व्यवस्थेतील त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्रालयाच्या समितीने थेट नाशिक गाठले . कांद्याचा उत्पादन खर्च, मिळणारा बाजार भाव, निर्यातीचे परिणाम आधी विषयावर माहिती घेतली. या समितीने लासलगाव बाजार समितीत भेट देऊन बाजारातील लीलाव प्रक्रियेचे अवलोकन केले. कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे प्रश्न व मागण्या समजून घेतल्या . नाफेड व एनसीसीएफ मार्फत सरकारी कांदा खरेदी सुरू आहे त्या खरेदी केंद्रावरील केंद्रीय समिती गेली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्रुटी बाबत माहिती घेतली .केंद्रीय समिती सरकारी खरेदीची चौकशी करीत असल्याची चर्चा उत्पादकामध्ये आहे . या समितीने सरकारी खरेदीच्या सध्याच्या व्यवस्थेत काय बदल करता येईल या दृष्टिकोनातून माहिती संकलित केल्याचे सभापती बाळासाहेब शिरसागर यांनी सांगितले.