विसा स्केटिंग ऑकडमीच्या 2 स्केटर्सनी आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेत 4 आंतरराष्ट्रीय पदके जिंकून लासलगावचा आंतरराष्ट्रीय गौरव वाढवला.
सोमनाथ मानकर
भारत, श्रीलंका, यु ए ई, मालदीव आणि केनिया या पाच देशांच्या सहभागासह आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स चॅलेंज 2023 स्पर्धा नुकतीच याक पब्लिक स्कूल, खोपोली, मुंबई येथे संपन्न झाली.
इंडियन एन्ड्युरन्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने एन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. ज्यामध्ये भारत, श्रीलंका, UAE, मालदीव आणि केनिया या देशांतील सुमारे 500 स्केटर सहभागी झाले होते.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लासलगावच्या विसा स्केटिंग अकादमीच्या {3} स्केटर्सची टीम इंडियामध्ये निवड झाली होती ही अभिमानाची बाब आहे.
भारतीय संघामध्ये विसा स्केटिंग अकादमीच्या कु दुर्गा दिलीप गुंजाळ कु विराज शाम चौधरी पियुष अजय धनवट यांची निवड झाली होती.
विसा स्केटिंग अकादमीने या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी देशासाठी 4 पदके मिळवून मोठे यश संपादन करून भारताच्या पदकतालिकेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
स्केटिंग प्रशिक्षक शाम सर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या या स्केटर्सनी आपली सर्वोत्तम कामगिरी करून भारतासाठी 4 पदके जिंकली, ज्यात 1 सुवर्ण, 1 सिल्व्हर आणि 2कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारतीय संघाने या एन्ड्युरन्स इंटरनॅशनल चॅलेंज 2023 स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकून नंबर 1 टीम चॅम्पियनशिप ची विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली.
पदकतालिकेत भारत प्रथम श्रीलंका दुसऱ्या तर मालदीवचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. केनिया संघ चौथ्या तर यु ए ई संघ पाचव्या स्थानावर राहिलेत.
एन्ड्युरन्स इंटरनॅशनल स्पर्धेत देशासाठी 4 आंतरराष्ट्रीय पदके जिंकणारे विसा स्केटिंग अकादमीचे स्केटर –
१. कु दुर्गा दिलीप गुंजाळ {1} गोल्ड {1} सिल्व्हर पदक मिळवून इंटरनॅशनल विजय मिळवला
1: विराज शाम चौधरी {2} कास्य पदक
3: पियुष अजय धनवट सहभाग
सर्व विजेते वि स्केटिंग अकादमीचे मुख्य प्रशिक्षक शाम सर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विजेते स्केटर्स त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाचे श्रेय त्यांचे पालक आणि स्केटिंग इंटरनॅशनल कोच शाम चौधरी इंटरनॅशनल कोच दशरथ बंड इंटरनॅशनल कोच सतिश सिंग यांना देतात.
देशाला अभिमान वाटणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल सर्व विजेते स्केटर्स आणि विसा स्केटिंग अकादमीचे प्रशिक्षक शाम सर चौधरी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शाम सर चौधरी इंटरनेशनल स्केटर
हेड कोच विसा स्केटिंग ऑकडमी प पु स्वामी वासुदेवनंदगिरी गुरू मौनगिरी जय जनार्दन अनाथ व वृध्द आश्रम पिपळगाव नजिक
एन व्ही पी काॅलेज लासलगाव
सरस्वती माध्यमिक विद्यालय लासलगाव सर्वानी शुभेच्छांचा वर्षाव केला व अभिनंदन केले