घरफोडी करणा-या सराईत आरोपी गजाआड करण्यात पेल्हार पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश.
देविदास निकम
रामनगर सृष्टी, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे
फोन नं. ०२२-२९४५१
पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०९/०९/२०२२ रोजी पहाटे ०२.३० वाजता ते ०३.०० वाजताचे सुमारास वैष्णवी फास्टनर्स कंपनीत, शिवांगी इंडस्ट्रीयल इस्टेट, गाळा नं बी-०३, अवधुत आश्रमचे पाठिमागे, नालासोपारा पूर्व, ता. वसई जि. पालघर येथे दोन अनोळखी आरोपीत यांनी कंपणीचे लॉक डुप्लीकेट चावीने उघडून त्यावाटे कंपनीत प्रवेश करून कॉपर व एसएस वायरचे बंडल असा एकूण १,३५,०००/- रुपये किमतीचा माल घरफोडी चोरी करुन चोरून नेलेबाबत फिर्यादी श्री. व्यकटेंश गोविंदराज पिल्लई रा. फातीमा माता कॉन्वेन्द्र च्या विरुद्ध बाजुला, बाबोला रोड, पसई प यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी आरोपी वर पेल्हार पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नं. ७८२/२०२२ भा.दं.वि.सं. कलम ४५७, ३८० ३४ प्रमाणे दिनांक १३/०९/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तसेच पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १५/११/२०२२ रोजी रात्री २२.०० वा. ते दिनांक १६/११/२०२२ रोजी ०५.०० वा.चे दरम्यान फिर्यादी व साक्षीदार आपले राहते घरी हरीओम चाल, राशिद कंम्पाऊंड, धानियबाग, नालासोपारा पूर्व, ता. वसई जि. पालघर येथे झोपलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे दरवाजा कशाचे तरी सहाय्याने उघडून आतमध्ये प्रवेश करुन फिर्यादी व साक्षीदार यांचे घरातील दोन मोबाईल फोन व रोख रक्कम असा ८५००/- रुपये किमतीचा माल चोरी करुन चोरून नेला होता. सदरबाबत फिर्यादी श्री विजय मुन्नीलाल यादव, रा. सदर यांनी दिलेले तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुध्द पेल्हार पो.स्टे. गु.रजि.नं. ९७७/२०२२ भा.दं.वि.सं. कलम ४५७, ३८० प्रमाणे दिनांक १६/११/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाप्रमाणे पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवून तांत्रिक माहितीचे आधारे अनोळखी व अज्ञात आरोपीताचा शोध घेवून आरोपीत नामे. १) विकास रामसुरत यादव ऊर्फ महेंद्र, वय-२३ वर्षे, (२) शुभम भोलानाथ शुक्ला ऊर्फ संदीप, वय-२४ वर्षे, ३) रशिद हफिजुल्लाह अहमद, वय २६ वर्षे, सर्व रा. नालासोपारा (पु.) यांना वर नमुद गुन्हयात दिनांक १४/११/२०२२ रोजी अटक करण्यात आली असून सदर आरोपीत यांचेकडून गुन्हयात चोरी झालेले कॉपर, एसएस वायर बंडल तसेच मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १,४३,५००/- रुपये किमतीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपीत यांचेकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.
३) पेल्हार पोलीस ठाणे गु.रजि. नं. २) पेल्हार पोलीस ठाणे गु.रजि.नं. ३) तुळींज पोलीस ठाणे गु.रजि. नं. ७८२/२०२२, भा.दं.वि.सं. कलम ४५७, ३८०,४११, ३४ प्रमाणे, ९७७/२०२२, भा.दं.वि.सं. कलम ४५७, ३८० प्रमाणे, ७१८/२०२२, भा.दं.वि. सं. कलम ३८० प्रमाणे,
सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अमर मराठे, पोलीस निरीक्षक (प्रशासन), पेल्हार पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि/सनिल पाटील, पोहवा / योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, पोअं/संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बलीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ विरार कार्यालय नेमणुकीतील पोहवा / नामदेव होणे, नवनाथ तारडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.