जिल्हा परिषद अहिल्यादेवीनगर या शाळेला Read To Me App च्या वापरत जिल्ह्यात तिसरा रँक
मुख्य संपादक राहुल वैराळ

निफाड तालुक्यातील निफाड केंद्रातील अहिल्यादेवीनगर ही जिल्हा परिषदेच्या शाळेने Read To me या App चा वापर करून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे प्रभावी अध्यापन केल्याने Read To Me या इंग्लिश हेल्पर संस्थेच्या वतीने शाळेतील मुख्याध्यापक श्री. प्रविण भिका कोळी व सहशिक्षिका श्रीम. मनिषा श्रीराम निकम यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
महारष्ट्र शासन व इंग्लिश हेल्पर संस्थेच्या वतीने इंग्रजी भाषेवर विद्यार्थ्यांना प्रभुत्व संपादन करता यावे यासाठी रिड टू मी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. राज्यातील एकूण ९० हजारांपेक्षाही जास्त शाळांमध्ये तर नाशिक जिल्ह्यात ४७०० शाळांमध्ये या अॅपचा वापर सुरु आहे. विद्यार्थी व शिक्षकांना हे अॅप अतिशय उपयुक्त ठरत आहे.
निफाड तालुक्यात या अॅपचा शाळा अधिकाधिक वापर करत आहे. गटशिक्षणाधिकारी श्री. केशव तुंगार, विस्तार अधिकारी श्री. कैलास बोरसे व श्री. वसंत गायकवाड व निफाड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. निलेश विनायक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अहिल्यादेवीनगर निफाड या शाळेने या अॅपची वापराबाबतची अंमल बजावणी केल्याने इंग्लिश हेल्पर संस्थेच्या वतीने सोमवार दिनांक २१/११/२०२२ रोजी शाळेस स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी इंग्लिश हेल्पर संस्थेचे समन्वयक श्री. विशाल गलाटे यांनी रिड टू मी हे अॅप शाळेतील जास्तीत जास्त वापर करणे बाबत आवाहन केले. श्री. आत्माराम न्याहारकर विषयतज्ज्ञ यांनी इंग्रजी भाषा शिकणे किती आवश्यक आहे या बाबत मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी श्री. वसंत गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी श्री. केशव तुंगार यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन Read To Me या App द्वारे विद्यार्थी कसे अध्ययन करतात या बाबत प्रत्यक्ष वर्गात जाऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांची इंग्रजी वाचनाची गोडी पाहून समाधान व्यक्त केले व शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. प्रविण भिका कोळी यांनी केले तर सूत्र संचालन श्री. सुरेश धारराव यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील उपशिक्षिका श्रीमती. मनिषा श्रीराम निकम यांनी केले. या प्रसंगी निफाड नगर पंचायत वार्ड क्र. १ च्या नगरसेविका श्रीमती. अरुंधती पवार ताई, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. भारतीताई महाले, निफाड गटाचे गटशिक्षणाधिकारी श्री. केशव तुंगार, विस्तार अधिकारी श्री. कैलास बोरसे व श्री. वसंत गायकवाड , केंद्रप्रमुख श्री. निलेश शिंदे, बीआरसी चे विषय तज्ज्ञ आत्माराम न्याहारकर, भूषण साळुंखे केंद्रातील जेष्ठ शिक्षक श्री. अविनाश बागडे, प्रमोद चव्हाण, प्रमोद क्षीरसागर, श्री. विजय शिंदे व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने व पालकांच्या वतीने शाळेचे अभिनंदन करण्यात आले.