ताज्या घडामोडी

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाची पावसाळी सहल उद्या देवघरला

मुख्य संपादक राहुल वैराळ

नाशिकभारत सरकार मान्यताप्राप्त बहुउद्देशीय राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या पावसाळी निसर्ग सहलीचे उद्या रविवार दिनांक 23 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत देवघर (ननाशी, दिडोंरी) या निसर्गरम्य ठिकाणी सकाळी 9 वाजता आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष सोनवणे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील पेठ, दिंडोरी, सुरगाणा तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या दरीमध्ये असलेल्या निसर्गरम्य परिसरात या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाची आवड निर्माण व्हावी, जिल्ह्यात हरित क्रांतीची प्रेरणा मिळावी, झाडे लावा व झाडे जगवा ही संकल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी विविध वन औषधी बियांची ठिकठिकाणी पेरणी व रोपण करण्याचा देखील संघटनेचा उद्देश आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चा सत्र, वनभोजन व जंगल सफारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निसर्ग सहलीसाठी संघटनेचे नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी प्रयत्न करत आहे. सहलीसाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे प्रदेश संपर्क प्रमुख सोमनाथ मानकर, प्रसिद्धी प्रमुख संतोष अहिरे, संघटक व विजय केदारे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे, जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे, योगेश घोलप, महिला जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी कोटमे, व पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.