ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मांडवे गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर हनुमंत खाडे यांना वीरगती
ज्ञानेश्वर पोटे

सातारा जिल्ह्यातील मांडवे (ता. खटाव) गावचे सुपुत्र भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे वीरजवान ज्ञानेश्वर हनुमंत खाडे यांना दिनांक 19/6/2024 रोजी श्रीनगर कुपवाडा येथे कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली.
वीरजवान हुतात्मा ज्ञानेश्वर हनुमंत खाडे यांस भावपूर्ण श्रद्धांजली,ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद देवो.