जि.प.प्रा.शाळा इयत्ता पहिलीच्या वर्गात नव्याने दाखल चिमुकल्यांचे स्वागत व भाटगांव ता.चांदवड चे भूमीपूत्र यांचे आसाम रायफल्स मध्ये नियुक्ती बद्दल स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात…
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी नवीन मुलांचा प्रवेश व भाटगांव चे भूमी पूत्र कुमार राहूल गोविंद मोरे यांचे भारतीय सैन्य दलातील आसाम रायफल्स(बटालियन) मध्ये ट्रेड टेक्निशियन पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वागत समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता.
राहूल मोरे हे भाटगांव चे प्रगतशील शेतकरी श्री. गोविंद मोरे यांचे कनिष्ठ चिरंजीव व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री.ह.भ.प.वैभव महाराज मोरे यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,श्री.पवार सर,श्री.गवळी सर,सौ.बच्छाव मॅडम,सौ.गायकवाड मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रवींद्र पोटे,श्री.विवेक काका पाटील,ह.भ.प.समाधान महाराज पगार,श्री.देविदास पोटे, श्री.रतन गांगुर्डे,श्री.नवनाथ (पप्पू )पवार व सर्व विद्यार्थी पालक स्वागत समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.