लासलगाव महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींसाठी तसेच संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.भास्कराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. हंडाळे साहेब, पोलिस उपनिरीक्षक पवन सुपनर, अंगोरे मॅडम, लासलगाव येथील समाजसेविका श्रीमती स्मिता कुलकर्णी, श्री.बारगळ साहेब इ. उपस्थित होते. या उद्बोधन वर्गात श्री. हंडाळे साहेब आणि यांनी मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पोस्को कायदा त्याचे महत्त्व व गरज सविस्तर सांगून अडचणीच्या वेळी हेल्पलाइन क्रमांक 112 आवर्जून वापर करावा व पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन केले. तसेच यावेळी बोलताना श्री.भास्कराव शिंदे म्हणाले, शिक्षणाने माणूस प्रगल्भ व सक्षम बनत असल्याने मुलींनी शिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे असा सल्ला दिला.
मुलींसाठी छेडछाड रोखण्यासाठी शासनाने स्वतंत्र कायदे केले आहेत. या कायद्यान्वये मुलींना संरक्षण व न्याय मिळण्यास मदत होणार आहे. तेंव्हा न घाबरता गुड टच व बॅड टच या विषयी आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगता आले पाहिजे. अंगोरे मॅडम यांनी किशोरवयीन मुलींना गुडटच बॅडटच, लैंगिक शोषण आणि महिलांबाबत विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे म्हणाले, ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून समाजात ताठ मानेने उभे राहण्यासाठी आमचे महाविद्यालय सदैव प्रयत्नशील असते. म्हणून विशाखा समितीच्या उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा समितीच्या प्रमुख श्रीमती दीपाली कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी पवार यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, इंग्लिश मीडीयम स्कूल च्या प्राचार्या श्रीमती शितल आचार्य, उपप्राचार्या श्रीमती मिनल होळकर, पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री.किशोर गोसावी, श्री.सुनिल गायकर इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्रीमती मीनल होळकर यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थिनी व शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.