
(वृत्त संकलन ) मुंबई विमानतळावर कोकेण तस्करीच्या विश्वासनीय माहितीवरून महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता आदीम अबाबाहून आलेल्या थाई महिलेला (21) विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. तिच्या जवळील सामानाची जळती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये इतकी आहे. महिलेवर अनेक गुन्हे दाखल करून तिला अटक करण्यात आले आहे.