आज दिंडोरी व कळवण येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या उपस्थितीत आशा दिवस निमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न झाला.
वैभव गायकवाड

आज दिंडोरी व कळवण येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या उपस्थितीत आशा दिवस निमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी डॉ भारती पवार यांनी आशा स्वयंसेविकांना संबोधित करतांना म्हणाल्या की कोरोना काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता देशातील सर्व आशाताई यांनी अतिशय मेहनत घेतली व सर्व सामान्य कुटुंबासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे होते.
या वेळी डॉ भारती पवार म्हणाल्या की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आशा वर्कर सेविकांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. देशभरातील सर्व आशा सेविकांना आता आयुष्मान भारत योजनेचा लाभ ही मिळणार आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या आशा ताईंचा डॉ भारती पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात दिंडोरी येथे शाम मुरकुटे,उज्वला कोथळे -उगले, शरद नागरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते ,डॉ.राजेंद्र बागुल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मांडगे,डॉ.मोरे
तर कळवण येथे दिपक खैरनार,दादाभाऊ पगार, कोठावदे बापू,अनिल महाजन,आशुतोष आहेर, प्रकाश कडवे, हेमंत पगार, काशिनाथ गुंजाळ, कृष्णकुमार कामळस्कर, दादा मोरे,बेबीलाल पालवी, सीमाताई कामळस्कर,मनोहर बोरसे, अमोल पगार,चेतन निकम, हितेंद्र पगार,किरण बोरसे, अशोक बोरसे, संदीप शिरसाठ, श्रीकांत वाघ, बबन वाघ,संदीप अमृतकर, कडू अण्णा,दिपक वेढणे,DHO डॉ सुधाकर मोरे, डॉ राजेंद्र बागुल, तहसीलदार वारळे,डॉ. रणवीर, BDO डॉ निलेश पाटील सह मोठ्या प्रमाणात आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.