महापालिका कंत्राटी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी गायब ,महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचा इशारा .
नाशिक प्रतिनिधी

नाशिक-महापालिकेतील आउट सोर्सिंग ची माध्यमातून विविध प्रकारची कामे ही ठेकेदारामार्फत केली जातात ,आणि ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी भरण्याची जबाबदारी ही त्या ठेकेदारांची असते .परंतु 2016 या कालावधीतील कंत्राटी कामगाराचा भविष्य निर्वाह निधी भरला नसल्यामुळे या कार्यालयाकडून महापालिकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच बँकेचे खाते गोठविण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेचा आकृतीबंध जवळपास 7090 पदाचा आहे. मात्र अद्याप नव्याने भरती झाली नसल्याने जवळपास 4800 कर्मचारी सध्या स्थितीत कार्यरत आहे .यातही 2017 कर्मचारी असल्यामुळे शहराचा विस्तार वाढत असताना कर्मचारी व कामगारांची देखील त्याच प्रमाणात गरज आहे. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे काम होत नसल्यामुळे महापालिकेने काही विभागाच्या बाबतीत आऊट सोर्सिंगची भूमिका घेतली आहे .आऊट सोर्सिंग माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांचा भविष्य निर्वाह निधीची र क्कम भरणा करणे ठेकेदारांना बंधनकारक आहे . त्याच अनुषंगाने महापालिकेतून देखील करार करण्यात आले आहेत . मात्र 2016 मध्ये भविष्य निर्वाह निधी भरणा केला नसल्याची बासमोर आली त्याचबरोबर महापालिकेतून भविष्य निर्वाह निधी भरण्यासंदर्भात कुठलेही पुरावे सादर झालेले नाही .जवळपास 17 लाख 76 हजार 295 इतकी रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे भरणे अपेक्षित आहे. त्या संदर्भात या कार्यालयाकडून महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडे देखील पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र अद्याप ती रक्कम भरले गेले नाही. त्यामुळे समाज कल्याण विभागाचे आयुक्त मयूर पाटील यांनी विविध विभागांना भविष्या निर्वाह निधी भरण्यासंदर्भात ठेकेदारांना सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची पूर्तता केली आहे किंवा नाही केली आहे, केली नसल्यास मक्तेदाराकडून पूर्तता करून योग्य ती कारवाई करावी अशा सूचना पत्राच्या माध्यमातून देण्यात आले आहे . त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी ची रक्कम वजा केल्याशिवाय ठेकेदाराचे देयक अदा करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी भरण्याची जबाबदारी त्या त्या ठेकेदारावर असली तरी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्कम भरली आहे किंवा नाही याची खात्री जमा पालिकेच्या संबंधित विभागांना करणे देखील गरजेचे आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी रक्कम भरले गेली नसल्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने महापालिकेवर कायदेशीर कारवाई किंवा बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया करण्याचा इशारा दिला आहे.