लासलगाव महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, दि. २३ येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री गोविंदरावजी होळकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हिमोग्लोबिन तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन नूतन विद्या प्रसारक संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर, माजी विद्यार्थी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.हसमुखभाई पटेल, श्री.सचिनशेठ मालपाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.मिलिंद राठी, माजी विद्यार्थी श्री.चंद्रकांत ठोके, श्री.राजेंद्र शिंदे या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे होते तसेच यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री.सत्तार शेख, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री.किशोर गोसावी, डॉ.नारायण जाधव, डॉ.विलास खैरनार, डॉ.संजय निकम, प्रा.मिलिंद साळुंके, एन.सी.सी. प्रमुख प्रा.बापू शेळके, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर, श्री.महेश होळकर, श्री.गणेश जाधव तसेच रक्तपेटीचे डॉक्टर आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. श्री.उज्वल शेलार यांनी माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराच्या आयोजनाचे समन्वयक म्हणून कामकाज पाहिले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, आजी व माजी विद्यार्थी तसेच स्पोर्ट, एन.सी.सी., एन.एस.एस. च्या स्वयंसेवकांनी रक्तदान केले. शिबिरात रक्तदात्यांकडून 58 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच 450 विद्यार्थीनींची हिमोग्लोबिन तपासणी देखील करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुनिल गायकर आणि प्रास्ताविक श्री.किशोर गोसावी यांनी केले तर आभार श्री.महेश होळकर यांनी मानले.