
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगांव, विंचूर, चांदवड, उमराणी आणि इतर ठिकाणी कांद्याला आज सरासरी अवघा १३००/- ते १५००/- भाव मिळाला, त्यामुळे शेतकर्यांनी लिलाव बंद पाडले. कालपर्यंत ४०००/-ते३५००/-कांद्याला दर मिळत होता.पण, केंद्र सरकारने रात्रीतून अचानक ३१ मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदीचा GR काढला, त्यामुळे सर्व संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन/निदर्शने करण्यात आली. ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला चांदवड येथे पोलिसांकडून शेतकर्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला