ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील शिरजगाव परिसरातील शेतात आज सकाळी सुखोई विमान कोसळले
मुख्य संपादक राहुल वैराळ

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील शिरजगाव परिसरातील शेतात आज सकाळी सुखोई विमान कोसळले. वैमानिकाने पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे आपली सुटका केली.
शिरजगावातील निर्मनुष्य ठिकाणी विमान कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी हानी झाली. या दुर्घटनेत विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विमान कोसळल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. विमान कशामुळे कोसळले, याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.
निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात २०१८ मध्ये देखील एक सुखोई विमान तांत्रिक बिघाडामुळे द्राक्षबागेवर कोसळले होते. या घटनेची मंगळवारच्या अपघातामुळे पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले.