भुसावळातील ७५ लाखांचे गांजा प्रकरण; चालकासह दोन आरोपींना चांदवडमधून अटक

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे महामार्गावरील एका आयशर वाहनातून पाच क्विंटल वजनाच्या व ७५ लाख रुपये किमतीच्या कोरडा गांजा जप्त केला होता.
पोलिसांच्या कारवाईच्या सुगावा लागल्याने संक्षेप प्रसार झाले होते मात्र पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे चालकासह अन्य एका संशयीताच्या चांदवड येथून शुक्रवारी पहाटे मुसक्या बांधल्या आहेत.
ओरिसातील भुवनेश्वर येथून या गांजाची मालेगासह नाशिककडे तस्करी होणार असल्याची माहिती असून यात मोठे आंतरराष्ट्रीय रॉकेट सहभागी असल्याच्या संशय आहे. या प्रकरणातील बडे मासे पकडण्यासाठी आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर करण्यास असमर्थता दर्शवली.
जळगाव गणेश शाखा व बाजारपेठ पोलिसांनी गोपनी माहितीच्या आधारे सापळा रचत शुक्रवारी पाटील ट्रामा केअर सेंटर पुढे असलेल्या पेट्रोल पंपाच्या अलीकडे आयशर गाडी (एम.एच. १५ एच.एच. ६९९४) जप्त तक केली होती. या वाहनात इलेक्ट्रिक साहित्याच्या तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. या वाहनात १६ गोण्यांमधुन ७५ लाख ९ हजार रुपये किंमतीचा कोरडा गांजा जप्त करण्यात आला तर इलेक्ट्रिक सामानासह वहान मिळून एकूण ९३ लाख १३ हजार ४०० रुपयांच्या मुद्द्यांमध्ये जप्त करण्यात आला आहे भुसावळ शहर पोलीसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.