
चांदवड तालुक्यातील भाटगांव येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील सन १९९८-९९ च्या बॅचचे गेट टुगेदर चे नियोजन बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी घडवून आणले.योगायोगाने जिवलग मित्राचा वाढदिवस असल्याकारणाने सर्व मित्रांनी निर्णय घेतला की मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी नियोजन करू आणि त्याप्रमाणे सर्वांनी नियोजन करून चांदवड येथे श्री ईच्छापूर्ती गणेश मंदीर येथे सर्वांनी एकत्र जमून वाढदिवसानिमित्त गेट टुगेदर साजरा केला.