
सिन्नर – शहराजवळील माळेगाव औद्योगिक वसाहत नजीक शेती शिवारात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची तीन बछडे आढळून आल्याने एकाच खडबड उडाली. ते आपल्या आई पासून दुरावले असता त्याची आपल्या आईसोबत पुन्हा भेट घडवून आणण्यात सिन्नरच्या वनविभागाला यश मिळाले आहे. माळेगाव औद्योगिक वसाहती जवळ नामदेव काकड यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरू आहे. त्या दरम्यान तेथे मजुरांना तीन बिबट्यांचे बछडे आढळून आले असतात त्यांनी शेतमालाक व स्थानिकांना कळविले. स्थानिकांनी वनविभाग सिन्नर यांना कळविले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तीनही बछड्यांना एक टोपली खाली ठेवले त्यानंतर रात्रीच्या सुमारास मादी उसाच्या शेतात येऊन आपल्या बछड्यांचा शोध घेतला व तिने टोपली बाजूला करून या तीनही बछड्यांना अलगद उचलून नेले.