ताज्या घडामोडी

जिल्हा परिषदेतील कर्मचारी निलंबित पाच कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची कारवाई .

नाशिक प्रतिनिधी

नाशिक – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आठ कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. कारवाई करण्यात आलेल्या मध्ये ग्रामपंचायत विभागातील दोन, बांधकाम विभागातील दोन, शिक्षण विभागातील तीन तर आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील तीन कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन करण्यात आले असून यामुळे नाशिक जिल्हा परिषद मध्ये मोठी खडबड उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या कामकाजाविषयी वारंवार तक्रारी येत होत्या , त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पथक पाठविले असता वैद्यकीय अधिकारी हे तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न कळवता गैरहजर असल्याचे आढळून आले .त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असताना त्याची वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती . त्यामुळे या संदर्भात चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. तसेच दिंडोरी तालुक्यातील सहविचार सभेत दोन शिक्षकांमध्ये वाद निर्माण होऊन हाणामारी करतानाची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. यात एका शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. तर इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे गावातील जिल्हा परिषद शाळेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची भेट दिली होती, त्यावेळी शाळेत कुणीही हजर नव्हते. त्यामुळे मुख्याध्यापकावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ग्रामपंचायत विभागातील प्रतिनियुक्ती असलेले ग्रामसेवक बाबतीत तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ग्रामसेवकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. तर दुसऱ्या एका प्रकरणात मालेगाव तालुक्यातील वळवाडी येथे कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकांनी नागझरी आणि हाताने ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीसाठी दिले नाही, तसेच निमशेवाडी येथील लेखा परीक्षण येथे नसल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आणि सुरगाणा पंचायत समिती येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना 40000 रुपयाची लास घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच बागलाण पंचायत समिती येथील उप अभियंता यांच्या कामकाजाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती, या संदर्भात संबंधित उपअभियंता कारणे दाखवा नोटीस बजाण्यात आली असून एकूण तीन जणांच्या निलंबनासह आठ जनावर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.