
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी तालुका म्हणून ओळख असणारा कळवण तालुका या तालुक्यातील पश्चिम भागातील 700 लोकसंख्या असणारा भाकुर्डे हा छोटाचा गाव या संपूर्ण आदिवासी गावात जवळ जवळ 125 शेतकरी कुटुंब राहतात.त्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक तरुणवर्ग कोणत्या कोणत्या तरी कलेत समाविष्ट दिसून येतात काही मुले शिक्षण बरोबर शेती करून विविध कार्यक्रम म्हणजे ढाकभक्ती काही तरुण वर्ग लोकनाट्य तमाशा काहींना बैलगाडी शर्यत तसेच काही ना खेळांमध्ये रस आहे. या गावातील सर्वच कुटुंब शेती करून आपलं कुटुंब चालवतात वर्ष भर शेती ची कामे करत असताना शरीराला शारीरिक व मानसिक ताण तणाव मधून बाहेर पडण्यासाठी भाकुर्डे गावातील काही तरुण वर्गाना एक कल्पना सुचली ती म्हणजे या गावात बरेच तरुण वर्ग हा भारतात खेळला जाणार लोकप्रिय क्रिकेट या खेळात भाकुर्डे गावातील तरुण खूपच चांगल्या प्रकारे खेळतात या गावातील क्रिकेट संघ कळवण सुरगाणा बागलाण दिंडोरी चांदवड तालुक्यात तसेच गुजरात डांग अहवा या सारख्या भागात या संघांनी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत भाकुर्डे गावाचं नाव रोशन केले आहे. गाजलेला तगडा असा संघ आहे.या संघात तगडे असे खेळाडू आहेत विक्रम जगताप,संजय पिठे, प्रवीण पवार,पंकज वाघ,राहुल जगताप,गणेश जगताप,नंदू गांगुर्डे सारखे तगडे खेळाडू आहेत या संपूर्ण वर्षभरात शेतीत राबून त्यातून वेळ काढून ज्या ठिकाणी क्रिकेटस्पर्धा भरवली असेल तिथं हा भाकुर्डे संघ जात असतो आणि उत्तम प्रकारे खेळ असा हा संघ दाखवत असतो.या गावात एकसे बडकर एक खेळाडू आहेत जवळ जवळ 90 च्या आसपास असे आजी माजी खेळाडू आहेत त्यामुळे बाहेर गावी खेळायला जास्तीत जास्त 20 खेळाडू जात जात असतात सगळयाच खेळाडूंना कामात तुन वेळ नसतो म्हणून गावातील काही वरिष्ठ खेळाडू ने एक लिग भरवायची ठरवली एवढे खेळाडू आहेत परंतु गावात खेळायला क्रिकेट च मैदान नाही किंवा मोकळी पडीक जागा नसल्याने गावा शेजारी एका शेतकरी च्या जमिनीत कांद्याचे पीक होते उन्हाळ्यात कांदा काढून तो चाळीत साठवलं आणि वावर मोकळा झाला आणि ग्या वावर मध्ये ग्राउंड करण्याचे ठरवले दोनच दिवसात धावपट्टी व ग्राउंड तयार करून स्पर्धा भरण्याचे ठरवले ती म्हणजे जशी स्पर्धा जशी भारतात सर्वात मोठी उद्योजक स्पर्धा इंडियन प्रीमियर लिग भरवली जाते त्याच प्रकारे भाकुर्डे प्रीमियर लिग(BPL) स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले त्यामध्ये सर्वात प्रथम या bpl मध्ये 8 संघ तयार करायचे ठरवले ते 8 संघ ला संघ मालक तयार केलेत आणि नन्तर जस ipl मध्ये खेळाडूंचा लिलाव होतो त्याच प्रकारे लिलाव पद्धतीने खेळाडू घेण्याचे ठरले लिलाव पद्धतीत सर्वात प्रथम भाकुर्डे गावातील खेळाडूंची यादी बनवण्यात अली आणि ही स्पर्धा फक्त भाकुर्डे गावातील खेळाडूं साठी ठेवली त्यात बाहेरच्या गावातील कुठल्याच संघांना प्रवेश दिला नाही जे 8 संघ तयार केलेत त्यात सर्वात प्रथम भाकुर्डे गावातील प्रमुख खेळाडूंना प्रत्येक संघात विभागला गेलं आयकॉन प्लेयर म्हणून प्रत्येक संघात 2 प्रमाणे खेळाडू दिले नन्तर उर्वरित खेळाडूंवर बोली लावून खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली म्हणजे प्रत्येक संघ मालकाना पॉईंट देण्यात आले त्या दिलेल्या पॉईंट वरच बोली लावून खेळाडू घेण्यात आलेत आणि संघ तयार कऱण्यात आलेत परत दुसरा नियम लागू करण्यात आला जस ipl मध्ये बाहेरच्या देशातील 4 प्लेयर असतात तोच नियम bpl मध्ये लागू करण्यात आला पण त्या साठी फक्त भाकुर्डे शेजारील करंभेळ गावातील प्लेयर ना प्रत्येक संघात 3 4 असे खरेदी करून संघात सामील केलेत.दिनांक 30 मे 2023 पासून स्पर्धा ला सुरवात करण्यात आली ही स्पर्धा 3 जून 2023 पर्यन्त म्हणजे 5 दिवस चालली ही स्पर्धा लिग पद्धतीने खेळवण्यात आली आठ संघ प्रत्येक संघ एकमेकाबरोबर खेळलेत म्हणजे एक संघ लिग मध्ये 7 या प्रमाणे खेळलेत यात पॉईंट सिस्टिम वापरली या bpl 2023 चे live स्कोर crick heroj या ऑनलाईन अप वर प्रसारण करण्यात आले या स्पर्धेत सहभागी झालेले संघ
1)न्यूस्टार
2) न्यूपलटन भाकुर्डे
3)मास्टर 11
4)बेवडा 11
5)रॉयल चॅलेंजर भाकुर्डे
6)भाकुर्डे टायटन
7)एन बॉस
8)ढाकभक्ती
हे संघ सहभागी झालेत या स्पर्धेत एकूण लिग चे 28 सामने व प्लेऑप चे 4 सामने असे 32 सामने मर्यादित 8 -8 ओहरी चे खेळविण्यात आलेत या स्पर्धेत सर्वच संघ उत्कृष्ट खेळलेत त्या 8 संघा पैकी टॉप चे 4 संघ रॉयल चॅलेजर भाकुर्डे ,न्यूस्टार, भाकुर्डे टायटन, एन बॉस हे प्लेऑफ मध्ये खेळलेत त्या पैकी RCB व न्यूस्टार या दोन संघात फायनल खेळविण्यात आली यात रॉयल चॅलेंजर भाकुर्डे (RCB) संघ चॅम्पियन ठरला या सम्पूर्ण स्पर्धेत RCB संघाचे संघ मालक व कर्णधार विक्रम केशव जगताप खेळाडू ने संपूर्ण मालिकेत 9 सामन्यात 56 षटकार व 15 चौकार आणि 3 अर्धशतक च्या मदतीनें 440 धावा केल्या त्याची एका सामन्यात सर्वाधिक उच्च धावसंख्या 27 चेंडूत 95 नाबाद ही खेळी त्याने फायनल च्या सामन्यात केली गोलनंदाजी मध्ये सुद्धा 9 विकेट घेऊन ऑल रॉउंडर ची खेळी केली त्याला या मालिकेत मालिकावीर सामनावीर आणि ऑरेंज कॅप देन्यात आली दुसऱ्या क्रमांकावर पंकज वाघ विक्रम चाच भाचा याने 53 षटकार 9 चौकार व एक शतक 102 नाबाद च्या मदतीने 338 धावा केल्यात तसेच तिसऱ्या क्रमांकावर संजय पीठे धुवाधार फलंदाज याने 38 षटकार व 14 चौकार आणि 3 अर्धशतक च्या मदतीने 329 धावा केल्यात 4 क्र प्रवीण पवार याने 21 षटकार 7 चौकार च्या मदतीने 194 धावा केल्यात तसेच सर्वाधिक विकेट जयराम गावित याने 14 गडी बाद केलेत आणि पर्पल कॅप चा मानकरी ठरला.दुसरा क्र किरण आहेर ने 13 विकेट घेवून मानकरी ठरला तसेच या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या संघाला 31000 हजार चे बक्षीस ग्रुपग्रामपंचायत कोसुर्डे च्या सरपंच सौ …राजू बागुल यांच्या कडून देण्यात आले दुसरा क्रमांक न्यूस्टार संघाला 21000 हजार तिसरा क्रमांक 11000 व चौथा क्रमांक एन बॉस संघाला 5001 देन्यात आले.अश्या प्रकारे ही स्पर्धा पार पाडण्यात आली.या स्पर्धेला गावातील सर्व गावकरी मंडळी तरुण मंडळी शेतकरी व्यापारी दुकानदार नोकरदार वर्ग आयोजक व संयोजक यांनी सहकार्य केले भाकुर्डे प्रीमियर लीग 2023 मध्ये भाकुर्डे करंभेळ गावातील सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदवला व ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.यात ज्या ने ज्याने हातभार लावला त्यांचे सर्वांचे आभार मानण्यात आले.