के. के. वाघ इंग्लिश स्कूल काकासाहेबनगर शाळेचा निकाल १०० टक्के….
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर.

के. के. वाघ इंग्लिश स्कूल काकासाहेबनगर शाळेचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले. प्रथम पाच आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे-
* मोरे श्रुती बापू = ९३.००%
* घंगाळे संस्कृती धनंजय = ९२.००%
* चव्हाण संस्कृती विलास = ९१.६०%
* भवर ओम ज्ञानेश्वर = ९१.४०%
* शिंदे पृथ्वी देविदास = ९१.२०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. समीर बाळासाहेब वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, समन्वयक डॉ. भूषण कर्डिले, शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद कदम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच शादाब शेख, संदीप शिंदे, यशवंत पवार, सुनीता काळे, रेजिना हिरे, शीतल वाघ, पल्लवी कोल्हे, भाग्यश्री पानगव्हाणे, स्वप्निल चकोर, योगिता जगझाप आदि मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.