
उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे गावास साडेतीनशे वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे .या गावात समर्थ रामदास स्वामी यांचे पट शिष्य कल्याण स्वामी यांनी परंडा तालुक्यात तर जगन्नाथ स्वामी यांनी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे गावात रामदासी मठाची स्थापना केली होती.या मठास सांजा कावळेवाडी खामगाव व दाऊतपुर या गावांमध्ये चौदाशे ९९ एकर जमीन मठाच्या मालकीची असून त्यातील ४०० एकर जमीन अवैध पद्धतीने परस्पर विकण्याचा प्रकार उस्मानाबाद मध्ये घडलेला आहे.याशिवारातील जमिनी खंडाने कसण्यासाठी शिवारातील शेतकऱ्यांना दिलेल्या असून त्याचा गैरव्यवहार झालेला आहे .या प्रकारामध्ये तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांचा सहभाग असल्याचा आरोप मठाचे विश्वस्त रामचंद्र महाराज तळवळकर यांनी केलेला आहे.हा व्यवहार ४०० कोटींचा झाला असून झालेले व्यवहार रद्द करून सर्व जमीन मंदिर संस्थान ला परत देण्याची मागणी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून.गेल्या तीन वर्षापासून मंदिर संस्थान जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरवठा करत असून त्यांना कसलेही दाद दिली जात नाही .प्रशासन मात्र झालेले व्यवहार मान्य करत असून झालेली व्यवहार बेकायदेशीर आहेत व होऊ नये म्हणून आम्ही मंदिर प्रशासनाला सर्व मदत करणार असल्याचे व शासनाच्या आदेशानुसार मंदिराची जमीन मंदिर संस्थांच्या ताब्यात देण्यासाठी पूर्ण पोलीस बंदोबस्त देऊन मंदिर संस्थांन ला सर्व जमिनीचा ताबा देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले.