
नाशिक – यंदा नाशिकने गेल्या दहा वर्षातील सरासरी तापमानाचा पारा ओलांडल्याने राज्यातील सर्वाधिक उष्ण 15 जिल्ह्याच्या यादीत नाशिकचा समावेश झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आपल्याकडे दहा वर्षाच्या सरासरी तापमानाची नोंद ठेवत असते. त्यानुसार महाराष्ट्राचे सरासरी तापमान 41.73 अंश सेल्सिअस इतके आहे. परंतु यंदा एप्रिलमध्येच नाशिकचा पारा 40 पार गेल्याने नागरिक हैराण झाले आहे .नागरिकांना असाय उकाळा जाणवत असल्याने भर दुपारी घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यातच सातत्याने चाळीशी पार होणाऱ्या विदर्भातील नागपूर ,वर्धा ,अकोला ,अमरावती, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्याचा पारा सरासरी 40 ते 45 च्या वर राहिला आहे. त्यात या आठ जिल्ह्यांच्या यादीत नाशिक जिल्ह्याचा समावेश होतो हे नाशिककरांसाठी गंभीर बाब आहे. या जिल्ह्यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मार्गदर्शन केले जाते, नाशिकचा पारा ४० अंश सेल्सिअस वर गेल्याने नागरिक आजारी पडू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.