रूकडी ग्रामपंचायत पंधरावा वित्त आयोगामधून ग्रामपंचायत विकास कामांचा शुभारंभ

हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील
ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गायकवाड यांच्या
माध्यमातून प्रभाग क्रमांक तीन मधील अंतर्गत भुयारी गटर्स या विकासकामाचा शुभारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी. आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक मा. आ. डॉ. सुजित मिणचेकर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक, माजी ग्रामपंचायत सदस्य, पप्पू उर्फ बाबासाहेब कांबळे,, यांनी केले,याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा जो उपक्रम हाती घेतला आहे अतिशय उत्कृष्ट आहे भुयारी गटार योजना ही एक सामाजिक बांधिलकीतून केलेलं विकास काम आहे या माध्यमातून सर्व जाती धर्मांच्या लोकांचे कल्याण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले रेल्वे भुयारी मार्गातून होणारे नागरिकांचे हाल कमी होतील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट केली याबद्दल सर्वांचे कौतुक त्यांनी केले व संरक्षक भिंत बांधली पाहिजे असं ते बोलत होते यावेळी उपस्थित सर्वांनी आपली मते मांडली याप्रसंगी रुकडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. राजश्री रुकडीकर. माजी समाजकल्याण सभापती शामराव गायकवाड, माजी. जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, माजी सरपंच नंदकुमार शिंगे,माजी उपसरपंच व ग्रामपचायत सदस्य शितल खोत, सिकंदर पेंढारी, पंचायत सदस्य,पप्पू मुरूमकर,आसमां बडेखान, माजी ग्रामपंचायत सदस्य. सतीश कांबळे, सुभाष कांबळे, संतोष रूकडीकर, माजी उपसरपंच शामराव दत्तू गायकवाड, संजू लोंढे,राजू मुल्ला, राजू सुतार, कुमार कोळी,निवास रुकडीकर, शरद कांबळे , देवानंद कांबळे सर,बाबासो चव्हाण, दिलीप आण्णा,रवींद्र गायकवाड, सुनील कांबळे,विशाल गायकवाड, सागर जंगले, मोहन चव्हाण व लखन कांबळे, अजित कांबळे, पांडुरंग कांबळे,वॉर्डातील सर्व नागरिक उपस्थित होते.
आभार प्रदर्शन अविनाश साकेत यांनी मानले.