ताज्या घडामोडी

इंस्टाग्राम वर तलवारीचे प्रदर्शन करणारे पोलिसांच्या ताब्यात.

सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर – शहरातील हॉटेल शाहू परिसरात एका पल्सर दुचाकी वर बसून हातात असलेली तलवार हवेत फिरवताना व्हिडिओ रील बनवून व इंस्टाग्राम या सोशल वेबसाईटवर 1—- धीरज—-2 या अकाउंट द्वारे अपलोड करण्यात आला होता . या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडे गुप्त माहिती मिळाली असता त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने instagram वरील त्या रील ची पडताळणी केली व त्यानुसार वरील रील बनवून अपलोड करणाऱ्याचे वर्णन घेऊन गुन्हे शाखेचे पथक सिन्नरमध्ये या तरुणाचा शोध घेत असता सात फिर गल्ली मध्ये वर्णन असलेले दोन संशयित पोलिसांच्या निदर्शनास आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता ऋषिकेश राजेंद्र बोरसे (24) वावी वेस सिन्नर व धीरज बाळू बर्डे (21) सातपीर गल्ली सिन्नर अशी त्यांची नावे असून त्यांची रील्स मधील तलवारी बाबत चौकशी केली असता त्यांनी सिन्नर शहरातील ढोके नगर भागात राहणारा गुरुनाथ भागवत हळकुंडे यांच्याकडून त्या तलवारी घेतल्याचे सांगितले त्यानुसार गुरुनाथ हळकुंडे यांचा पोलिसांनी शोध घेतला असता त्याला हॉटेल शाहू परिसरामधून ताब्यात घेतले व त्याचीही तलवारी संदर्भात चौकशी केली असता त्याने पंजाब अमृतसर येथून विकत आणल्याची कबुली दिली व मनेगाव रोड येथील गाईच्या गोठ्यात तलवारी लपवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पंचांच्या समक्ष त्या तलवारी गोठ्यातून पोलिसांनी जप्त केल्या. हवालदार सतीश जगताप, पोलीस शिपाई विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, कुणाल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात रील बनवणारे दोघे व त्यांना तलवार पुरविणारा अशा तिघा विरुद्ध कायद्याने बंदी असलेले प्राणघातक हत्या बाळगणे व त्याचे प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.