जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव तालुका चांदवड येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भाटगांव- चांदवड तालुक्यातील भाटगांव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या एक ते चार नंबर येणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्र पोटे आणि श्री. अनिल पोटे यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी श्री. पवार सर, श्री. गवळी सर, सौ. गायकवाड मॅडम, सौ. बच्छाव मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, भाटगांव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. हिराबाई पगार, उपसरपंच श्री. किरण भवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, गावातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक आदी सर्व मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.