लातुर च्या एस टी डेपो मॅनेजरने चालकाची हक्काची रजा मंजूर करण्यासाठी स्वीकारली लाच
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या लातूर विभागातील लातूर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. बालाजी वसंतराव आडसुळे, वय 50 वर्षे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग, लातूर आगारात एस.टी. बसच्या चालक (ड्रायव्हर) पदावर कार्यरत असलेल्या चालकास त्यांचे घरी लग्नकार्य व घराचे बांधकाम असल्याने त्यांनी सन 2024-2025 वर्षातील 15 दिवस अर्जित रजा व 15 दिवस रजा रोखीकरण मंजूर होण्याकरिता दि.20/03/2024रोजी आगार व्यवस्थापक आडसुळे यांचेकडे अर्ज दिला होता.
सदर रजा मंजूरीच्या अनुषंगाने तक्रारदार हे दि.05/04/2024 रोजी आगार व्यवस्थापक बालाजी आडसुळे यांचेकडे गेले असता आडसुळे यांनी अर्जित रजा व रजा रोखीकरण मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडे 2,000/- रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे तक्रार केली.
दि.08/04/2024 रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक आडसुळे यांनी तक्रारदार यांना 2,000/- रुपये लाचेची मागणी केली. दरम्यानच्या कालावधीत आरोपी लोकसेवक आडसुळे हे शिखर शिंगणापूर येथे यात्रा कर्तव्य बजावण्याकरिता गेले होते.
दि.22/04/2024 रोजी लातूर आगारात कर्तव्यावर हजर होताच सदर लाचेची रक्कम आडसुळे यांनी स्वतःचे कार्यालयात शासकीय पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.
त्यावेळी आरोपीस सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशन शिवाजी नगर, लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.
यापूर्वी सन 2015 मध्ये देखील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, लातूर आगार येथे आगार व्यवस्थापक यांचे केबिनमध्ये वाहक नानजकर यांना 7000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी लातूर पथकाने कारवाई केली होती.
या यशस्वी सापळा कारवाई दरम्यान डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड (मो.नं.9623999944)यांनी तपास अधिकारी
श्री.भास्कर पुल्ली पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्यूरो, लातूर यांना व त्यांच्या पथकास यशस्वी मार्गदर्शन केले.
तरी या द्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ ॲन्टी करप्शन ब्यूरो कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लातूर यांच्याशी संपर्क साधावा.
दुरध्वनी – 02382-242674
श्री.संतोष बर्गे, पोलीस उपअधीक्षक,
(मो.नं.774481253)
टोल फ्रि क्रंमाक 1064