नाशिक जिल्हयातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या जबरी चोरी करणारा अटल चोर गजाआड
मुख्य संपादक राहुल वैराळ

संपुर्ण नाशिक जिल्हयात महिलांच्या गळयातील सोन्याचे दागीने चोरण्याचे प्रमाणात वाढ झाली असतांना पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीन श्री शहाजी उमाप व अपर पोलीस अधिकक्षक श्रीमती माधुरीताई कांगणे यांचे मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीन च्या पथकाने गुप्त बातमीदारा मार्फत बातमी काढुन शिवाजी पांडुरंग कु-हे रा. वळदगाव, ता. येवला या सोनसाखळी चोरास अटक करून त्याची निफाड न्यायालयाकडुन पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्याचे कडे चौकशी केली असता त्याने येवला तालुका पोलीस स्टेशन हददीत व लासलगाव पोलीस स्टेशन हददीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
येवला तालुका पोलीस स्टेशनला इंदुबाई यादवराव कापसे, वय ६७ वर्ष रा. निफाड यांचे गळ्यातील २ तोळे वजनाची सोन्याची पोत चोरी गेलेने त्यांनी तक्रार दाखल केली आहे. अटक आरोपीताकडे चौकशी करता त्याने इंदुबाई यादवराव कापसे यांचे गळयातील २ तोळे सोन्याची पोत सोनाराकडे मोडले असलेची कबुली दिली असुन ते सोने सोनाराकडुन हस्तगत करण्यात आले आहे. तसेच लासलगाव पोलीस स्टेशन हददीत गारवा लॉन्स येथून सौ. वृशाली सतिश हाडणे, वय ३१, व्यवसाय प्रोफेसर, रा. कौशल्या निवास पाटील लॉन्स मागे, सोमेश्वर, गंगापुर रोड, नाशिक यांचे चोरी झालेले सोन्याचे दागीने बददल दि. २२/०५/२०२३ रोजी लासलगाव पोलीस स्टेशनला तकार दिली आहे. अटक आरोपीताकडे विचारपुस करता त्याने सदर चोरी केलेले दागीने हे बजाज फायनान्स लासलगाव शाखेत तारण ठेवल्याचे सांगुन बजाज फायनान्स कडुन सदर सोने हस्तगत करण्यात आले आहे.
लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निराक्षक श्री राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा
पुढील अधिक तपास पोलीस उप निरीक्षक श्री देविदास विश्वनाथ लाड हे करीत आहेत.