
वणी – नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्यात द्वितीय क्रमांकाने गौरवान्वित झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचे विषेश सादरीकरण वणीत उत्साहात करण्यात आले. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे या संकल्पनेवर आधारित या चित्ररथाचे प्रदर्शन वणीत झाल्याने चैतन्यमय वातावरण तयार झाले.
होते.दि.१६मार्च रोजी सकाळी दहा वाजता वणी येथील खंडेराव महाराज मंदिर पटांगणातून या चित्ररथास प्रारंभ झाला.दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार व वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.नीलेश बोडखे यांच्या हस्ते या चित्ररथाची पूजा करण्यात आली. खंडेराव मंदिर, बसस्थानक, वणी पोलीस ठाणे, काॅलेज रस्त्यावरुन हा चित्ररथ ग्रामपंचायत समोर आणण्यात आला. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.व सांगता करण्यात आली. वणी ग्रामस्थांकडून चित्ररथाचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.या सादरीकरणात शालेय विद्यार्थांनीही सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, आदिवासी नृत्य सादर केले. लेझीम पथकानेही चित्ररथाची शोभा वाढविली. चित्ररथाचे संयोजक जयेश खोट यांचा सत्कार वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.नीलेश बोडखे, सरपंच मधुकर भरसठ, उपसरपंच विलास कड, महेंद्र बोरा,महेंद्र पारख, यांच्या हस्ते करण्यात आला.
डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्रसंग टिपण्यासाठी वणीकरांसह भाविकांमध्ये उत्सूकता दिसून येत होती. महिला भाविकांचीं उपस्थिती देखील लक्षणीय होती. कार्यक्रमाचे नियोजन वणी येथे चित्ररथ समिती वणीचे दर्शन दायमा, पीयुष भंवर, भास्कर पाटील, चेतन कुऱ्हाडे, प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, मयुर जैन, सतीश जाधव, संतोष दुसाने, प्रमोद भांबेरे, मनोज थोरात, दिगंबर पाटोळे, आबा मोर आदी समिती सदस्य, वणी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद थोरात व विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी केले.