इचलकरंजीतील गॅरेज चालकाचा 21 हून, अधिक वार करून खून,,,,,,,

हातकणंगले इचलकरंजी रस्त्यावरील कोरोची माळावर धारदार शस्त्राने तब्बल 21 वार करून इचलकरंजीतील गॅरेज चालक भरत पांडुरंग येसाळ,, वय 36 याचा निघृण, खून करण्यात आला ही घटना गस्ती पथकाच्या सतर्क तेमुळे, शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाले आहे कुणाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही इचलकरंजी येथील रेणुका झोपडपट्टी परिसरात भरत येसाळ, हा कुटुंबासह राहण्यास होता तो ट्रकचा मिस्त्री असून त्याचे इचलकरंजीतील भगतसिंह बागेजवळ गॅरेज आहे शनिवारी रात्री बारा वाजता ट्रक बंद पडला असून दुरुस्तीसाठी या असा त्याला मोबाईलवर निरोप आला त्यामुळे भरत दुचाकीवरून हातकणंगलेचे दिशेने गेला दरम्यान हातकणंगले पोलिसांच्या गस्ती पथकाला शनिवारी मध्यरात्री भरत रस्त्यावर मृता अवस्थेत पडलेला दिसला पोलिसांनी नातेवाईकांना तात्काळ बोलावून घेतले श्व़ान पथक फॉरेन्सिक, टीमलाही घटनास्थळी पाचारण करून तपासाला सुरुवात केली पहाटे हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उतरणीय तपासणी करण्यात आली भरत येसाळे याच्या शरीरावर धारदार शस्त्राने 21 वार असल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वायचळ संग्राम पाटील सुरजीत चव्हाण पोपट भंडारे महादेव खेडकर सुहास गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळुंके यांनी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले अधिक तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत