ताज्या घडामोडी
लासलगाव महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.