शेतकऱ्यांसाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक

रुकडी ता.हातकणंगले येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे येथील कृषिकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकाअंतर्गत कृषिकन्यांनी हरभऱ्याच्या बियाण्यांवर बीजप्रक्रिया करून दाखवली. यासाठी त्यांनी प्रथम बुरशीनाशक , किटकनाशक व नंतर जैविक खताचा वापर केला. बीजप्रक्रिया करण्याचे फायदे, उत्पादनात होणारी वाढ याची माहिती कृषीकन्यांकडून सांगण्यात आली.या प्रात्यक्षिकसाठी गावातील शेतकरी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी प्राचार्य डी. एन. शेलार,कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी व्हि. एन. पाटिल,विषयतज्ज्ञ ए.आर.जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषिकन्या प्रीती चंदनशिवे, कोमल कदम, साक्षी पाथरवट, अवंतिका पाटिल, प्रज्ञा पाटिल, सनिका पाटील , सुमिच्छा सूर्यवंशी उपस्थित होत्या.