ताज्या घडामोडी

लासलगाव टाकळी विंचूर येथील पत्रकार यांच्या वर ठेकेदार शेखर शेलार यांनी केला गुन्हा दाखल

संपादक सोमनाथ मानकर 

लासलगाव : टाकळी विंचूर येथील ग्रामपंचायतीतील सरकारी ठेकेदार शेखर राजाराम शेलार रा. निफाड यांच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरून पत्रकार सुरेश अंतू अहिरे याच्याविरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

याबाबत शेखर राजाराम शेलार रा. शांतीनगर, निफाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, टाकळी विंचूर ता. निफाड येथील भूमिगत गटारी, सिमेंटचे रस्ते आदी कामांसाठी साहित्य पुरवठ्याचे काम निविदेद्वारे ग्रामपंचायतीने मला दिले आहे. त्यानुसार पुरवठ्याचे काम सुरू असताना टाकळी विंचूर येथील रहिवासी व पत्रकार सुरेश अंतू आहिरे यांनी वारंवार फोन करुन सदर कामाच्या टक्केवारीची मागणी केली. माझा हिशोब पूर्ण कर नाहीतर माझ्या वृत्तपत्रात तुझी बदनामी करेल, अशी • धमकीही दिली. सदरचा प्रकार मी टाकळी विंचूरच्या सरपंच अश्विनी जाधव, ग्रामसेवक शरद पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे यांच्यासह पोलिस पाटील विलास काळे, तंटामुक्ती संघटनेचे अध्यक्ष शंकर शिंदे ग्रामपंचायत सदस्य त्यांना सांगितल्यानंतर सुरेश अहिरे याने फोन करून मला लासलगाव येथील गुंजाळ पेट्रोलपंपावर बोलावून घेतले. यावेळी माझ्यासोबत सरपंचांचे पती राजेश्वर जाधव हे देखील होते. यावेळी आहिरे याने तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्याचे संभाषण मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले आहे. पैसे दिले नाही तर अहिरे `याने स्वतः च्या वृत्तपत्रातून बदनामीची धमकी दिली. या सर्व प्रकरणाकडे जातीने लक्ष घालावे यासाठी ठेकेदार शेखर शेलार यांनी ज्या ठिकाणी त्यांचे गटारी किंवा इतर सरकारी कामे चालू असतील त्या सर्व ग्रामपंचायतींना भविष्यात अशा लोकांपासून धोका निर्माण होऊ शकतो किंवा गावाचा विकास थांबवू शकतो असे मत निफाड तालुक्यातील सभापती पंचायत समिती निफाड, सरपंच टाकळी विंचूर, माजी सरपंच टाकळी विंचूर, सरपंच ब्राम्हणगाव विंचूर, सरपंच तामसवाडी, सरपंच सारोळे खुर्द, सरपंच मरोळ गोई बुद्रुक, सरपंच भरवस, सरपंच दहेगाव, सरपंच देवगाव , सरपंच कानळद व इतर ग्रामपंचायतचे सरपंच लासलगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित राहुन सहाय्यकपोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना निवेदन देऊन सदर पत्रकारावरती योग्य ती कारवाई करावी असे आशयाचे निवेदन सर्व निफाड तालुक्यातील सरपंच यांनी दिले. तसेच इतर ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना निवेदन देऊन सदर पत्रकारावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.