शेतक-यांनी शेतमाल साठवणुकीसाठी वखार महामंडळाचा वापर करावा – साठा अधिक्षक लासलगाव
प्रतिनिधी श्री .ज्ञानेश्वर भवर

“वखार आपल्या दारी” या संकल्पनेतुन शेतकरी/शेतकरी उत्पादक संस्था यांचे करिता शेतमाल साठवणुक, व्यवस्थापन, वखार पावती तारण योजना तसेच गोदाम सुविधा या विषयांवरील दि.8.11.2023रोजी एकदिवसीय कार्यशाळा वेळापुर येथे वखार महामंडळ, लासलगांव यांचेतर्फे आयोजीत करण्यात आली होती.यावेळी शेतक-यांनी शेतमाल साठवणुकीसाठी वखार महामंडळाचा वापर करावा व योजनांचा लाभ घ्यावा असे श्री.भुषण पाटील साठा अधिक्षक लासलगाव यांचेकडुन सांगण्यात आले. यावेळी श्री. प्रल्हाद चौधरी साठा अधिक्षक,मनमाड यांनी वखार महामंडळाकडुन देण्यात येणा-या सुविधा जसे शेतक-यांना वखार भाडेमध्ये ५० टक्के सवलत, गोदामात २५ टक्के राखीव जागा, शेतमालास १०० टक्के विमा संरक्षण, वखार पावती तारण योजना याबाबत मार्गदर्शन केले.तसेच बाजार समिती लासलगाव तर्फे राबविण्यात येणा-या वखार पावती तारण कर्ज योजनेतुन वखार महामंडळाकडुन देण्यात येणा-या वखार पावतीवर ७५ ट्क्क्यापर्यंत कर्ज तेही फक्त ६ टक्के दराने देण्यात येते याबाबतची माहिती श्री.सुरेश विखे,सहा.सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव यांच्या कडुन देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री.नारायण पालवे, सरपंच, वेळापुर यांनी महामंडळाच्या योजनांचा जास्तीत फायदा घ्यावा असे उपस्थीत शेतक-यांना सांगितले.
यावेळी लासलगाव केंद्राचे साठा अधिक्षक, भुषण पाटील, प्रल्हाद चौधरी, साठा अधिक्षक मनमाड,नारायण पालवे, सरपंच, सुरेश विखे,सहा.सचिव,केदु शिंदे, भाऊराव पवार, योगेश पाटील,सतिश शिंदे, विशाल पालवे, गणेश ठाकरे,नाना दराडे, सुभाष शिंदे, भिकन शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.