मिरजेत ,8, हजाराची,लाच घेताना महापालिकेच्या मुकादमस अटक सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

मिरज- चार महिन्याची, हजेरी लावून त्यांचे मानधन काढल्याच्या मोबदल्यात ,8,हजाराची लाच घेताना महापालिकेच्या मुकादमला अटक करण्यात आली मिरजेत मंगळवारी दुपारी लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील यांनी दिली किशोर जगन्नाथ जबडे, वय, 48, असे अटक केलेल्या मुकादमाचे नाव आहे तक्रारदार प्रभाग क्रमांक, 20, मध्ये काम करतो त्याची चार महिन्याची हजेरी लावून चार महिन्याचे मानधन प्रभारी मुकादम जबडे यांनी काढले होते त्याच्या बदल्यात प्रत्येक महिन्याचे तीन हजार याप्रमाणे बारा हजार रुपयांची लाचेची मागणी जबडे यांनी तक्रारदाराकडे केली होती मात्र तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्याने याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती त्या तक्रारीनुसार त्याची पडताळणी केल्यानंतर जबडे यांनी ,8, हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर मंगळवारी मिरज शहर पोलीस ठाण्याजवळ, एका चहाच्या टपरीजवळ सापळा लावण्यात आला होता त्यावेळी मुकादम जबडे याला तक्रारदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे शासकीय निमशासकीय लोकसेवा कडून लाचेची मागणी झाल्यास 9821880737, या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उप, अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे