सप्तशृंगीचरणी धावपटू होणार लीन. रविवारी गडावर ‘सप्तशृंगी हिल’ मॅरेथॉन स्पर्धा
संपादक सोमनाथ मानकर

सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी राज्यातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील निसर्गरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठी देखील नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स आयोजित सप्तशृंगी हिल मॅरेथॉन २०२२ सहावे पर्व’ रविवार दि. १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे आणि नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी दिली. या आरोग्यदायी वातावरणाचा अनुभव सर्वांना घेता यावा या उद्देशाने नाशिक शहरातील ‘नाशिक रनर्स’ या ग्रुपपने रविवारी १६ ऑक्टोबर रोजी ‘सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन २०२२’ चे आयोजन केले आहे. सध्या व्यायामाप्रती जनसामान्यांत अधिकाधिक जागरूकता निर्माण होत असून धावण्याकडे जनतेचा कल वाढत चालला आहे. हे एक चांगले लक्षण आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्यविषयक जागरूकता अधोरेखित करण्याचा नाशिक रनर्स ग्रुपचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ही स्पर्धा २१ कि.मी. स्त्री/पुरुष, १० कि.मी. स्त्री/पुरुष व ५ कि.मी. स्फुत रन स्त्री/पुरुष अश्या प्रकारात होणार आहे.शिवाय ही मॅरेथॉन ग्रामीण भागात भरवली जाणार असल्याने या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखविण्याची संधी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन ही एक आगळीवेगळी मॅरेथॉन असून जास्तीतजास्त संख्येने लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी केले आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू झाली असून ऑनलाइन बंद झाली असून ऑफलाइन नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेसाठी नाशिकमधील सर्व “आर्यनमैन” उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी विनोद गोल्हे. मो.९८२२२७४८९९ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे मॅरेथॉन आयोजन व यशस्वीतेसाठी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स, नाशिक यांसह ग्रामपंचायत सप्तशृंगी गड व ग्रामपंचायत नांदूरी प्रयत्न करीत आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने नांदुरी ते सप्तश्रृंगी गड ही वाहतूक सेवा सकाळी ६ ते ९:३० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील, याची नोंद घ्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
असे असेल ‘सप्तशृंगी हिल
1.गडाचा पायथा नांदुरी गाव येथून स्पर्धेला सुरुवात
2.२१ किमी साठी नांदुरीगाव ते शिवालय तिर्थ आणि पुन्हा परत तसेच १० किमी साठी मंकी पॉईंट व परत असा मार्ग
3.स्पर्धेचे अंतर २१ किमी व दहा किमी
4. हौशी धावपटूंसाठी ०५ किमी अंतराचे डिव्हाइन रन
5.शर्यतप्रसंगी गडावर जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार वेळ सकाळी सहा ते साडे नऊ
6.धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी आदिवासी लोकनृत्ये आणि नाशिक ढोलचे आयोजन
7. स्पर्धकांची आरोग्यविषयक सुरक्षा म्हणून जागोजागी रुग्णवाहिकांसह डॉक्टरांची टीम उपलब्ध