
कै.माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव . ता.निफाड विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. प्रथम सरस्वती मातेचे व संस्थापक अध्यक्ष कै. माणिक मढवई सर यांच्य प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन, व सर्व गुरुजनांचे दर्शन घेऊन आम्ही खूप अभ्यास करून मोठे यश मिळऊ असा संकल्प केला.मुख्याध्यापिका श्रीमती मढवई अनिता माणिक यांनी गुरुपौर्णिमा महत्व सांगितले.
श्री.केदारे सर, श्री गलांडे सर, श्री गांगुर्डे सर,श्री दिवटे सर,श्री. देवडे सर यांनी गुरुौर्णिमेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.गलांडे सर होते. तर सूत्रसंचालन कू.समीक्षा गांगुर्डे (इ.10वी,) हिने केले.
रायते शिवाजी, यश गुरगुडे, श्वेता पगारे, समिक्षा पवार, कोमल कराटे, यश गायकवाड, रसाळ , प्रांजल मोरे,संदेश गांगुर्डे यांनी व इतर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वंदमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.