24 तासाच्या आत आरोपी यांना अटक पेल्हार पोलिसांची कामगिरी
निफाड तालुका ब्यूरो चिप देविदास निकम

रिक्षा चोरी करुन पायी जाणा-या इसमांना मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपीतांना २४ तासाचे आत अटक- पेल्हार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १८/१२/२०२२ रोजी पहाटे ०३.३० वा. चे सुमारास फिर्यादी हे त्यांचे राहते घरी जाण्यासाठी नालासोपारा फाटा येथुन रिक्षाला हात करून रिक्षामध्ये बसुन जात असतांना त्यांची रिक्षा रिलायन्स पेट्रोल पंपाचे पुढे ३० मिटर अंतरावर मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रं.८ चे गुजरात वाहिनीवरील सर्व्हिस रोडवर पेल्हार नालासोपारा (पु.), ता. वसई, जि. पालघर येथे आली असता रिक्षामधील फिर्यादी यांचे बाजुला बसलेले व रिक्षा चालविणारा असे तिन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करुन ठोश्याबुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचेकडील मोबाईल फोन, हातातील घडयाळ व रोख रक्कम असा एकुण १४,०००/- रुपये किंमतीचा ऐवज जबरीने घेवुन त्यांना चालत्या रिक्षातुन ढकलुन देवुन पळुन गेले होत. सदरबाबत फिर्यादी श्री. अजित जंगबहादुर यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तीन अनोळखी आरोपी वर पेल्हार पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. १०६८/२०२२ भा.दं.वि.सं.कलम ३९४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दिनांक १८/१२/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांनुसार नमुद गुन्हयातील रिक्षा व अनोळखी आरोपीत यांचा शोध घेणेकामी पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वेगवेगळी पथके तयार करुन गुप्त बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपी नामे. १) रवि गुप्ता, वय १९ वर्षे, २) विवेक राय, वय २२ वर्षे, ३) अमित पासवान, वय १९ वर्षे, सर्व रा. तुंगारफाटा, सातीवली, वसई (पु.) यांना गुन्हा दाखल झाले पासुन २४ तासाचे आत अटक करुन गुन्हयातील रोख रक्कम, मोबाईल फोन व घडयाळ असे आरोपीतांतकडून हस्तगत करुन तसेच इतर गुन्हयातील दोन ऑटो रिक्षा, वेगवेगळ्या कंपन्यांचे एकुण १६ मोबाईल फोन, असा एकुण २,३५,७०० /- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच नमुद आरोपीत यांचेकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.