ताज्या घडामोडी
पुणतांबा येथे श्रावण सोमवारी ऐतीहसिक गंगापूजन आणि गंगा आरती चे प्रारंभ.
प्रतिनिधि - रेणुका पगारे

पुणतांबा येथील युवा पुणतांबा ग्रामस्थ यांच्या वतीने अनोखी परंपरा सुरू करण्यात आलेली आहे, ती म्हणजे दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीच्या अहिल्यादेवी होळकर घाट येथे पहिल्या श्रावण सोमवारी गंगा आरती प्रारंभ करण्यात आली , या ऐतीहासिक गंगा आरती ला ग्रामस्थांचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गंगा आरती प्रारंभ करण्या हेतू अहिल्यादेवी होळकर घाट विविध पताका आणि रांगोळी काढून सजवण्यात आले होते, पुर्ण विधिवत पुरोहितांनी पंचआरती च्या सहयाने प्रसन्न वातावरणात आरती संपन्न झाली, गंगा आरती श्रावण च्याप्रत्येक सोमवारी होईल अशी माहिती युवा पुणतांबा ग्रामस्थ यांनी दिली.