के. के. वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेबनगर येथे योग दिन उत्साहात साजरा
ज्ञानेश्वर भवर

के. के. वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेबनगर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योग्य दिनाचे औचित्य साधून शाळा व कानिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक श्री. डॉ. भूषण कर्डीले यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्व सांगत व्यायाम दैनंदिन आयुष्यासाठी का गरजेचा आहे हे पटवून दिले. क्रीडा शिक्षक श्री भूषण निकम यांनी विविध आसनांचे प्रात्याक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. सदर आसनांची माहिती सांगत विद्यार्थ्यांकडून विविध आसने करून घेतली.
योग दिनानिमित्त महाविद्यालयातील ६७८ विद्यार्थी व ३४ शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. शरद कदम यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्व सांगत योगासने आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक कसा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विविध कथांच्या माध्यमातून आरोग्याची काळजी ही काळाची गरज कशी हे पटवून दिले.
यावेळी श्री. विकास शिंदे, श्री. गणेश आवारे, श्री. किरण शिंदे, श्री. योगेश पुंड, श्री. उत्तम कर्वे, श्री. सचिन कोल्हे, श्री.शेख शदाब, श्री. संदीप शिंदे, श्री. यशवंत पवार, श्री. चकोर स्वप्नील, श्री. योगेश खैरे, शितल टर्ले, भाग्यश्री पानगव्हाणे, आढाव सोनाली, मोकळ अर्चना, भाग्यश्री खराक, बेंडके पल्लवी, सुनीता काळे, लोहारकर दुर्गा, रोशनी शिंदे, पल्लवी कोल्हे, शितल शिंदे, श्वेता पगारे, ज्योत्स्ना सोनार, दिपाली दाभाडे, पूनम अष्टेकर, सारिका कुशारे, योगिता जगझाप, सुरेखा सोनवणे, नेहा देसाई, रीना शिरसाठ, योगिता बिडवे आदी उपस्थित होते.