ताज्या घडामोडी
लासलगाव महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, ता. ११ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.