इंडियाबुल्स ला महिन्याभरात 512 हेक्टर क्षेत्र खाली करण्याचे एमआयडीसी कडून सक्त आदेश.
सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर – तालुक्यातील गुळवंच आणि मुसळगाव स्थित विशेष आर्थिक क्षेत्र (सेज) उभारण्याकरता इंडियाबुल्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला दिलेल्या क्षेत्रापैकी 512 हेक्टर क्षेत्र भूखंड महिन्याच्या आत खाली करावे असे आदेश एमआयडीसी बांधकाम विभागाने इंडियाबुल्स कंपनीला दिले आहेत. याबाबत 29 फेब्रुवारीला एमआयडीसी बांधकाम विभागाने नोटीस दिल्याने मार्च अखेरपर्यंत इंडियाबुल्स चे 512 हेक्टर क्षेत्र सरकारला परत मिळणार आहे .एमआयडीसी ने सेज साठी भूखंड दिला होता परंतु इंडियाबुल्सने एमआयडीसी ने दिलेल्या मुदतीमध्ये उद्योग उभारू शकली नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ही घोषणा केली. अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यात औद्योगिक विकासासाठी सिन्नर तालुक्यातील मुसळगाव व गुळवंच येथे 2006 मध्ये सेज निर्मितीचा निर्णय झाला होता आणि सरकारने एमआयडीसीच्या माध्यमातून मुसळगाव च्या 89 शेतकऱ्याकडून 418.02 हेक्टर व गुळवंच्या शेतकऱ्याकडून 976.15 cont….