रुकडी ग्रामपंचायत च्या वतीने नववधूला व वराला माहेरचा आहेर योजना सुरू करण्यात आली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा ठराव घेण्यात आला

रुकडी ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीने गावातील नवविवाहीत मुलीसाठी माहेरच्या साडी चोळीचा आहेर देण्याचा निर्णय घेतला असून ग्रामपंचायतीच्या
मासिक सभेमध्ये ठराव केला अशी माहिती सरपंच राजश्री रुकडीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या योजनेची सुरुवात 8 मार्च या जागतिक महिला दिना पासून होणार आहे. या साठी
मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे.
मुलीचे आई वडील हे रुकडी गावचे रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
मुलीचे लग्न आई वडिलांच्या समतीने होने गरजेचे आहे. आदि अटी पूर्ण काणाऱ्या रुकडी गावच्या रहिवाशी असणाऱ्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सरपंच रुकडीकर त्यांनी दिली.
गावातील कुटुंबानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला उप सरपंच शीतल खोत , ग्रा.प.सदस्य श्वेता दाभाडे , वनिता गायकवाड , सुजाता कांबळे , मालती इंगळे , शोभा कोळी , शमुवेल लोखंडे , राहुल माने , संतोश रुकडीकर , रमेश कांबळे आदी उपस्थित होते.