लासलगाव महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज २३ फेब्रुवारी रोजी
अज्ञान, अंधश्रद्धा आणि स्वच्छता यांची कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून समाज सुधारणेचे महान कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली..!
यावेळी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले तसेच यावेळी डॉ.संजय निकम, डॉ.संजय शिंदे, प्रा.रावसाहेब खुळे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, प्रा.विरेंद्र आहेर, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनील गायकर आणि प्रा.देवेंद्र भांडे प्रा.गणेश जाधव, प्रा.शरद सोनवणे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शन लाभले.