राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामावर चोरट्यांचा डल्ला, पावणेपाच लाखाचा मद्यसाठा लंपास
मुख्य संपादक राहुल वैराळ

नाशिक: पंचवटीतील पेठरोड परिसरात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे गोदाम आहे.
या गोदामाच्या खिडकीचे गज कापून चार लाख ८८ हजार रुपयांचा मद्यसाठा लंपास करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सरकारी कार्यालय असूनही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक अथवा सी.सी.टी.व्ही. कॅमेरा नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी होणाऱ्या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल या गोदामात ठेवला जातो.
गोदामात विदेशी दारूचा जप्त करण्यात आलेला मद्यसाठाही ठेवण्यात आला होता.
चोरांनी मद्याचे ६५ खोके चोरून नेले.
हा प्रकार संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तपासणीसाठी गेले असतांना उघड झाला.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदामातील मालाची जबाबदारी संबंधित विभागाची असतांना त्या दृष्टीने परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, सुरक्षारक्षक याची नेमणूक होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.